गडचिरोली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय जिंकलं. त्यांनी आपल्या प्रखर भाषणांतून जनतेला प्रभावित करून आपला मराठी बाणा कायम जोपासला. राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देऊन सेवाभाव जोपासत जनकल्याणाची सेना म्हणून शिवसेनेची ओळख निर्माण केली. त्यांचे प्रेरणादायी विचार आजच्या युवा पिढीला आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये आत्मबल आणि नवचैतन्य निर्माण करणारे आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी बाणा आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही. मुखातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव येताच अंगातील रक्त सळसळते. कोणती समस्या सहजासहजी सुटत नसेल तर संघर्ष व आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही हे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना पटवून दिले. जनतेची कोणतीही समस्या असल्यास मदतीसाठी शिवसेना सर्वात पुढे येते, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, प्रशांत ठाकुर, संदीप भुरसे, संजय बोबाटे, सचिन निलेकर, मुकेश गुरनुले, सुरज उइके, अमित बानबले, आनंदराव चुधरी, दिलीप चनेकर, ईश्वर लाजुरकर, पुंजीराम चुधरी, भगवान चनेकर, राहुल खेवले, तानाबा दजगये, नानाजी काळबंधे, राहुल सोरते, अंबादास मुनघाते, धनेश्वर सुरकर, धानेश्वर फुकेट, सूरज कोलते, निकेश लोहबरे, सुरज शेंडे, विलास देशमुख, सोनू ठाकरे, रविंद्र मिसार, निरंजन लोहबरे, जगन चापडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोगरकर, रूमान भांडेकर, विलास नैताम, दिलीप वलादे, अमित उईके, कवदुजी धन्द्रे, राहुल मड़ावी, गणेश दहलाकर, यादवजी चौधरी, जवीन कुरुड़कर, विनोद लेनगुरे, वैभव तिवाड़े, हेमंत चुधरी, सुनील करतेस, पूर्ण उन्दिरवाडे, मोतीराम चंद्रगिरी, समीर शेख, सचिन भुसारी, मुकेश आवारी, मुरारी धोटे, भूषण गुरुकार, चंद्रभान कोमलवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.