गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते मंगळवारी (दि.२६) लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.बंटी भांगडिया, माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, लोकसभा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, गोंदियाचे माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांच्यासह महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
सकाळी ११ वाजता खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅली काढली जाईल. केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आणण्यासाठी आणि महायुतीच्या विजयाचा संकल्प करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामांकन दाखल केले जाणार आहे.
यावेळी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष ॲड.येशुलाल उपराडे, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.श्याम हटवादे, संजय गजपुरे, भारत खटी, प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, गोविंद सारडा, योगिता पिपरे, किसान आघाडीचे रमेश भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, अरुण हरडे यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील.
लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन लोकसभा निवडणूक प्रमुख किशन नागदेवे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले आहे.