जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून पाळला राष्ट्रीय निषेध दिन

सरकारी कर्मचारी महासंघाचा पुढाकार

गडचिरोली : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी- अधिकारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि.26) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुनील चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, जि.प.महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शिंदे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे किशोर सोनटक्के, नितीन श्रीगिरीवार, पियुष आखाडे, महेश इंदुरकर, योगेश सोरते, आशिष सोरते, सतीश भरडकर, विवेक दुधबळे, अजय बोडणे, कल्पना भांडेकर, रेखा आत्राम इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.