अहेरी : याआधी संधी देऊनही कोणतीही कामे न केल्याने निष्क्रिय नेत्यांना आणि अतिमहत्वाकांक्षेत, अतिउत्साहात आमदारकीची घाई करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून घरी बसवा, असे आवाहन करत मंत्री धर्मरावबाबा आत्राम विरोधकांवर गरजले. मंगळवारी येथील वासवी हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिरात ते अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते.
यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, श्रीकांत मद्दीवार, सांबय्या करपेत, सुरेंद्र अलोणे, कैलास कोरेत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिराचे औचित्य साधून विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश मडावी यांनी तर संचालन रियाज शेख यांनी केले. आभार कैलास कोरेत यांनी मानले.