मतदार आता विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही- अरविंद पोरेड्डीवार

आ.गजबेंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

आरमोरी : लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष संविधान बदलणार असल्याचा आरोप करत लोकांची दिशाभूल करत होते. परंतु त्यांच्या या भुलथापांना आता लोक बळी पडणार नाही. खऱ्या अर्थाने संविधानाची जोपासना भारतीय जनता पक्षानेच केली आहे आणि पुढेही करणार आहे. त्यामुळे सर्वांनी मतदारांच्या भेटी घेऊन एकजुटीने कामाला लागावे. कृष्णा गजबे यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे 2019 प्रमाणे आपल्याला जोमात कामाला लागायचे आहे, असे प्रतिपादन सहकार नेते तथा सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले.

आरमोरी येथील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पिरिपा या महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख किसन नागदेवे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अर्चना गोंदोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, भाजपचे तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष वृषाली भोयर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय हेमके, आरमोरी नगरपरिषदेचे माजी सभापती भारत बावनथडे, ज्येष्ठ नेते देवाजी पिलारे, नगर परिषदेचे माजी सभापती व भाजपचे शहराध्यक्ष विलास पारधी, कुणाल पिल्लारे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल तितरमारे तसेच धुरंधर सातपुते, अनिल अलबनकर, प्रफुल्ल राचमलवार, प्रशांत मोगरे, संगीता मेश्राम, जयश्री भोयर, श्रीधर पोटेकर, दिवाकर गराडे, प्रभाकर सहारे, अनिल खापरे, उद्धव दिघोरे, गणेश मंगरे असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे यांनी तर आभार भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय हेमके यांनी केले.