Home दैनंदिन बातम्या अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता विनामुल्य स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता विनामुल्य स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी

गडचिरोली : अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विनामुल्य एमपीएससी (MPSC) स्पर्धापूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आज दि.28 ला संपणार आहे.

जिल्हा निवड समितीच्या विविध पदभरतीबाबत, तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांबाबत या प्रशिक्षण कार्यक्रमात विनामुल्य मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड (EMPLOYMENT CARD) असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणादरम्यान रु.1000 (एक हजार रुपये) दरमहा विद्यावेतनही दिले जाणार आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.29 नोव्हेंबर 2024 रोजी शासकीय संकुल, बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.