धानोरा : तालुक्यातील निमगांव येथे गेल्या 10 वर्षावासून असलेला धम्मध्वज तहसीलदार माळी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता उतरवून बौद्ध बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत, समाजबांधवांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली.
यावेळी बौद्ध बांधवानी एकत्र येऊन तहसीलदार माळी यांचा तिव्र शब्दात निषेध करुन त्यांना निलंबित करण्यात यावे, जातीय द्वेशातून केलेल्या कारवाईबद्दल त्यांच्यावर ॲट्रॅासिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा, उतरविलेला धम्मध्वज पूर्ववत फडकवून देण्यात यावा, असे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात निमगांवातील बौद्ध बांधवांसह रिपब्लिकन पार्टीचे प्रा.मुनिश्वर बोरकर, रिपाइं नेते डॉ.गोपाल रायपुरे, बसपाचे जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम, बामसेफचे भोजराज कन्हेकर, प्रमोद राऊत, वंचितचे बाळू ढेंभुर्णे, जी.के.बारसिंगे, सामजिक कार्यकर्ते चक्रधर मेश्राम, समता सैनिक दलाचे कमांडर अभिमन्यु बन्सोड, पिंकी शेन्डे, प्रभा मेश्राम, सुधीर वालदे तर निमगांवमधून राहुल वासनिक, शितल मेश्राम, रोशन रामटेके, केशव खोब्रागडे, मिलिंद वासनिक, शुभांगी बारसागडे, मारोती भैसारे, दशरथ साखरे, चोखोबा ढवळे, संघमित्रा राजवाडे, विशाखा देवतळे आणि इतर समाजबांधव सहभागी झाले होते.
































