Home पब्लिक प्रॉब्लेम आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून दीपिकाच्या कुटुंबाला 1 लाखाची मदत

आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून दीपिकाच्या कुटुंबाला 1 लाखाची मदत

जपतलाईत सर्पदंशामुळे गमावला जीव

एटापल्ली : तालुक्यातील जव्हेली येथील दीपिका एतवा लकडा (12 वर्षे) ही धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना 10 ऑगष्टच्या मध्यरात्री झालेल्या सर्पदंशाच्या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे लकडा कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी वैयक्तिकरित्या 1 लाख रुपयांचा धनादेश कुटुंबियांना दिला.

दीपिका ही एटापल्ली तालुक्यातील जव्हेली येथील मूळची रहिवासी आहे. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवार, दि.18 ऑगस्ट रोजी एटापल्लीच्या दौऱ्यात दीपिका लकडाच्या परिवाराचे सांत्वन करून एक लाखाची आर्थिक मदत दिली. या परिवाराच्या पाठीशी सदैव उभे राहणार असल्याचे सांगून हिम्मत व धीर दिला.

याआधी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सल्ल्यानुसार दीपिकाच्या अंत्यसंस्काराकरिता डॉ.मिताली आत्राम यांनी सुद्धा कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत केली होती.