पावसाने मारली दडी, ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील धान रोवणी खोळंबली

अनेक भागातील शेतात पडल्या भेगा

गडचिरोली : धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सध्या बहुतांश शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण अजूनही जवळपास ५० हजार हेक्टरवरील धानपीकाची लागवडच झालेली नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते. दोन आठवड्यांपासून या भागात पुरेसा पाऊस नसल्याने धानाची रोवणी खोळंबली आहे. सध्या तर ऊन तापत असल्याने परिस्थिती आणखीच बिकट झाल्याचे दिसून येते.