गोंदिया : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील दुर्गम, मागास म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आता गोंदिया-बरौनी एक्सप्रेसचा थांबा मंजूर झाला आहे. त्याचा शुभारंभ शनिवार दि.२३ रोजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार आहे.
अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांसह नागरिक, शेतकऱ्यांची दुपारनंतर रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाडीच्या थांब्याची मागणी प्रलंबित होती. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन त्यांना याबाबतच्या मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली होती. या प्रयत्नांना अखेर यश आले.
सालेकसा रेल्वे स्टेशनला 15231/32 या गोंदिया-बरौनी एक्सप्रेसचा थांबा मंजूर झाला. शनिवारी खा.अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या थांब्याचा शुभारंभ होईल अशी माहिती खासदार नेते यांच्या कार्यालयाने दिली.