धानोरा : बाजार करण्यासाठी गोडलवाही या गावाला आपल्या दुचाकीने निघालेल्या इसमाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी रस्त्यालगतच्या जंगलात आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्या इसमाच्या डोक्याला जखम आहे आणि त्याची दुचाकी सुद्धा गायब झाली आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे.
मोतीराम पदा (45 वर्ष) रा.पद्दाबोरिया, ता.धानोरा असे मृत इसमाचे नाव आहे. मोतीराम हे रविवारी गोडलवाही येथील बाजारासाठी आपल्या दुचाकीने निघाले होते, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत ते परतलेच नसल्याने शोधाशोध सुरू झाली. सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह गावापासून 2 किमी अंतरावर असलेल्या रस्त्यालगतच्या जंगलात सापडला.

गोडलवाही पोलीस मदत केंद्राने त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन मंगळवारी धानोरा येथे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.