Home दैनंदिन बातम्या आजपासून वादळी पावसाची शक्यता, पण पेरणीची घाई करू नका

आजपासून वादळी पावसाची शक्यता, पण पेरणीची घाई करू नका

10 जूनपर्यंत मान्सूनची हुलकावणी

गडचिरोली : तीव्र ऊन कमी होऊन आता हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून दुपारनंतर काही प्रमाणात वादळी पावसाचीही शक्यता आहे. तापमानात घट होणार असल्याने नागरिकांना बराच दिलासा मिळणार आहे. मात्र मान्सूनचा पाऊस येण्यासाठी आणखी किमान 10 दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता हवामान विभागाने विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून करण्यात आले आहे.

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन खालीलप्रमाणे योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

* शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.
* ⁠विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.