आलापल्लीत नरेन्द्राचार्य महाराज भक्त मंडळातर्फे रक्तदान शिबिर

51 दात्यांनी घेतला सक्रिय सहभाग

अहेरी : आलापल्ली येथे नरेन्द्राचार्य महाराज रामानंदाचार्य, दक्षिण पिठ नाणीज धाम (रत्नागिरी) यांच्या संप्रदाय भक्तसेवा मंडळ अहेरी, आलापल्लीच्या वतीने सोमवारी (दि.13) श्रीराम मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 51 रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केले.

सदर शिबिराचे उद्घाटन प्राणहिता कॅम्प येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल टोलिया होते. यावेळी आयटीआयचे प्राचार्य, एपीआय जिजा घुटे, रेणु टिचकुले, आरती सरोदे, अर्चना जुवारे, धर्मराव फलके, चामोर्शी तालुका युवाध्यक्ष गणेश सुरजागडे, विनोद नागपुरवार, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॅा.कन्ना मडावी, प्राचार्य निरज खोब्रागडे, एलआयसीचे विकास अधिकारी मुनेश्वर हडपे, केन्द्र प्रमुख महेश मुक्कावार, आर्यवैश्य कोमटी समाजाचे विश्वस्त व्यंकटेश मदेर्लावार, अहेरी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, प्रा.पद्भनाभ तुंडुलवार, श्री संप्रदायाचे जिल्हा सेवाध्यक्ष प्रकाश कुनघाडकर, रक्तपेढी प्रमुख आनंद पिपरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, लोमेश भांडेकर, विवेक चेलेलवार, संगीता बुरांडे, प्रमिला फरकाडे, निर्मला उपलेंचवार, पल्लवी शेट्ये यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

या रक्तदान शिबिरात प्राणहिता कॅम्पमधील सीआरपीएफ बटालियन 37 च्या जवानांसह, पोलीस कर्मचारी, आर्य वैश्य कोमटी समाज बांधव, व्यापारी वर्ग तथा विविध सामाजिक संघटना व महिला संघटनेने सहभाग नोंदविला. सदर रक्तसंकलन केलेल्या पिशव्या उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील ब्लड बँकेत जमा राहणार आहे.

सदर रक्त परिसरातील अपघातग्रस्त, प्रसुतीचे रुग्ण, सिकलसेल व अन्य गरजु रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अहेरी रुग्णालयातील डॅा.दुर्वा, कौशल कोतपल्लीवार, निखील कोंडापर्ती, आँचल घुगुल, कशिरा भुते, रेणुका जंपलवार, शियान कुरेशी, रश्मी मार्गमवार, शांतीकुमार गेडाम, शवि मडावी, मेहराज शेख, शितल आर्का, संध्या बंकावार, तुळशीदास कुत्तरमारे, सुनील देशमुख, नितीन खरवडे, संतोष लोणारे, श्रीनिवास नामनवार, निलेश रामगीरवार, अक्षय फलके, अनिकेत खरवडे, सुनील देशमुख, शिवम सरोदे, आदित्य खरवडे व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन रविन्द्र ठाकरे यांनी केले.