विसोरा येथे दिव्यांग शिबिरासह कृषी व महिला मेळावा उत्साहात

सरकार दिव्यांगांच्या पाठिशी- गजबे

देसाईगंज : जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती देसाईगंज आणि ग्रामपंचायत विसोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विसोरा येथील ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग शिबिर, कृषी व महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना माजी आमदार कृष्णा गजबे यांनी महायुतीचे सरकार दिव्यांगांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. पुढील काळात त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी आ.रामदास मसराम, तहसीलदार प्रीती डुडूलकर, विसोराचे सरपंच रमेश कुथे, डॅा.गहाने व इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.