Home दैनंदिन बातम्या भीमरॅलीने दुमदुमली राजनगरी, अहेरीत आंबेडकर जयंतीचा उत्साह

भीमरॅलीने दुमदुमली राजनगरी, अहेरीत आंबेडकर जयंतीचा उत्साह

बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश

अहेरी : येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सामाजिक कार्यकर्ते सोहिल वाळके यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर सामूहिक त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले.

या कार्यक्रमात विचारपिठावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे, प्रा.गजानन जंगमवार, उमेश भारशंकर, रियाज शेख, कमलाबाई ओंडरे, नेहा वाळके, पुष्पा चांदेकर, उमा चालुरकर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून व माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक व संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन केले.

सायंकाळी अहेरी शहरातून ज्ञान प्रसारक मंडळ व बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भव्य भीमरॅली काढण्यात आली. या रॅलीत युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम सहभागी झाले होते. भीमगीतांसह जय भीमच्या गजराने अहेरी नगरी दुमदुमून गेली होती.