गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी शनिवारी संध्याकाळी दिल्लीवरून येताच गडचिरोली शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली.
काही सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देण्यासोबत खा.नेते यांनी माजी जि.प.सभापती रंजिता कोडापे, भाजपचे जेष्ठ नेते गजानन येनगंदलवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन पुजा-अर्चना करून महाप्रसादाचा लाभ घेतला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या स्वगृही महालक्ष्मी, ज्येष्ठा गौरी पुजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला खासदार नेते यांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. अशा सण-उत्सवाच्या उत्साही वातावरणात सर्वांच्या भेटीगाठी झाल्याने आपल्याला आनंद झाला, अशी भावना यावेळी खा.नेते यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, सामाजिक नेते रामायण खटी, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, प्रशांत भुगूवार, युवा नेते संजय बारापात्रे, आशिष कोडापे, भाजपचे युवा नेते अनिल करपे, माजी शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.