चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी कंपनीच्या वतीने उभारल्या जात असलेल्या लोह प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. खासदार अशोक नेते यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आणि प्रकल्पा कामाची माहिती जाणून घेतली.
यावेळी कोनसरी लोहप्रकल्पाच्या मॅनेजरनी त्यांना आतापर्यंत झालेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, कोनसरी येथील मॅनेजर झा व विश्वनाथ ढाल, चंदू बोंनगीरवार, बंडू बोंनगीरवार उपस्थित होते.