आरमोरी : शहराच्या बर्डीस्थित श्री दत्त मंदिर देवस्थानात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून सुसज्ज अशा सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले. या सभामंडपाचे लोकार्पण आ.गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त मंदिर देवस्थानच्या अध्यक्ष लक्ष्मी मने होत्या. विश्वस्त मंडळासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
बऱ्याच दिवसांपासून श्री दत्त मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने सभामंडपाची मागणी केली होती. श्री दत्त गुरुदेवांच्या कृपेनेच सभामंडप बांधकाम आणि लोकार्पण सोहळ्याचे भाग्य मला लाभले आहे. या सभामंडपाचा लाभ भाविक-भक्तांना होणार आहे. असेच समाजकार्य आपल्या हातून निरंतर होत राहो; अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन देविदास चेटुले यांनी तर आभार महेंद्र शेंडे यांनी मानले. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव नंदु पेट्टेवार, ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सदस्य तथा पूर्व विदर्भ संयोजिका डॉ.संगीता रेवतकर, छगन हेडाऊ, नानाजी चोपकर, श्रीराम सोरते, बंडूजी ढोकरे, महेंद्र शेंडे, बी.टी.सेलोकर, चंदू वटपल्लीवार, सुशील पोरेड्डीवार, राहुल तितीरमारे, गोविंदा भोयर, विजय सुपारे, गुणवंत गोंधोडे, विनायक गोंधोडे, गुणवंत हेडाऊ, रमेश गोंधळे, जितू ठाकरे, अमोल खेडकर, वत्सला शेंडे, कौशल्या मने, तुळसा बोरकर, सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यगण तथा नागरिक उपस्थित होते.