Home दैनंदिन बातम्या मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी रुग्णालयात धाव घेत दिला धीर

मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी रुग्णालयात धाव घेत दिला धीर

थोडक्याच बचावला 38 प्रवाशांचा जीव

गडचिरोली : शिवणी गावाजवळ शुक्रवारी दुपारी प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटून झालेल्या अपघातातील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर माजी खासदार तथा भाजप नेते डॅा.अशोक नेते यांनी रुग्णालयात धाव घेऊन घाबरलेल्या जखमींना धीर दिला. रुग्णालयातील व्यवस्थेचीही त्यांनी पाहणी करून डॅाक्टरांशी चर्चा केली. (खाली वाचा)

बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली. या अपघातात एका चिमुकल्यासह सुमारे 38 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (खाली वाचा)

गडचिरोली शहरापासून सुमारे 9 किलोमीटरवर शिवणी गावाजवळ हा अपघात घडला. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असल्याने अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सरकारी यंत्रणेने धावपळ करत अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविले. या अपघाताची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी तत्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. जखमी रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी गावंडे, डॉ.मनिष मेश्राम, डॉ.मनोहर मडावी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच जखमी प्रवाशांचे नातेवाईक उपस्थित होते.