Home दैनंदिन बातम्या सीबीएसई बारावीच्या निकालात प्लॅटिनम ज्युबिलीचा अमेय प्रथम

सीबीएसई बारावीच्या निकालात प्लॅटिनम ज्युबिलीचा अमेय प्रथम

जिल्हाभरातून चमकदार यश

गडचिरोली : येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवले. या शाळेचा अमेय जोशी 94.8 टक्के गुणांसह जिल्ह्यातून प्रथम आला आहे. त्याखालोखाल नवोदय विद्यालयाचा निकाल लागला आहे.

या यशामध्ये अमेय सुनील जोशी याने 94.8 टक्के गुण मिळवत जिल्ह्यात चमकदार कामगिरी केली. त्याला गणित विषयात 100 पैकी 100 गुण आहेत. अमेय याने दहावी (सीबीसई) परीक्षेतही 96 टक्के गुण मिळवून प्लॅटिनम शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता. नुकत्याच झालेल्या जेईई परीक्षत त्याने 98.5 पर्सेंटाइल मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे.

उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये दीपक अशोककुमार परतानी (86.6 टक्के), भार्गवी नरेश जनबंधू (86.0 टक्के), सार्थक अविनाश महाजन (81.00 टक्के) यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे शाळा व्यवस्थापनाच्या वतीने महासचिव अझिज नाथानी यांनी अभिनंदन व कौतुक करत त्यांना जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशिल राहण्याचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांच्या या यशात शिक्षक आणि पालकांचे सतत मार्गदर्शन आणि सहकार्याचा मोठा वाटा असून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध अध्ययनासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्राचार्य रहीम आमलानी म्हणाले.