गडचिरोली : संत रोहीदास महाराज एक थोर समाजसुधारक होते. त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी व प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. ते कोणत्याही सामाजाचा भेदभाव न करणारे महान सुधारक होते. त्यांच्या कार्याचा प्रसार करून त्यांचे विचार अंगिकारणे आवश्यक असल्याचे मत माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी व्यक्त केले.
संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळ गडचिरोलीच्या वतीने फुले वॅार्डमधील समाज मंदिरात संत रविदास महाराज जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यकमाच्या उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे बोलत होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष नथुजी अंडेलकर, मंडळाचे माजी सचिव सावजी बरिया, सल्लागार नामदेव काटवले, मोरेश्वर म्हशाखेत्री, वामन म्हशाखेत्री, राजेश्वर म्हशाखेत्री इत्यादी उपस्थित होते.
सर्वप्रथम योगीता पिपरे यांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना मार्लापण करण्यात आले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.