त्यांच्या भेटीने मिळाली सकारात्मक ऊर्जा, रामभाऊ हस्तक महाराजांची भावना

आजारपणामुळे सोमनानी दाम्पत्याने घेतली भेट

वैरागड : पंचक्रोशित सुपरिचित असलेले मानापूर येथील जेष्ठ नागरिक रामभाऊ हस्तक महाराज गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुरजागड इस्पातचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी यांनी दि.15 ला सपत्निक हस्तक महाराज यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बलराम सोमनानी आणि वैरागड ग्रामपंचायतच्या सदस्य शितल सोमनानी यांनी महाराजांना काळजी घेण्यास सांगून कोणतीही मदत लागल्यास कळवा, असा दिलासा दिला. सोमनानी यांच्या भेटीने आमच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या दिलासादायक शब्दांनी आजारी असलेली व्यक्तीसुद्धा आपली व्याधी विसरून जाते, अशी भावना यावेळी हस्तक महाराजांनी व्यक्त केली.

या भेटीप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बघुजी ताडाम, आदिवासी विविध सहकारी संस्था देलनवाडीचे व्यवस्थापक दिलीप कुमरे, शीतल सोमनानी, राहुल धाईत, तुकाराम वैरकार, वामन लाखनकर, पंकज किरंगे, भजनराव लाखनकर, गजेंद्र डोमळे, रामदास डोंगरवार आदी उपस्थित होते.