गडचिरोली : सूर्य पृथ्वीच्या जवळ आल्याने आता उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. दुपारी 12 वाजतानंतर घराबाहेर पडणे लोक टाळत आहेत. सूर्याची वाटचाल उत्तरायणात सुरू असल्याने दुपारी 12 वाजताच्या सुमारास सूर्य अगदी डोक्यावर येत आहे. त्यामुळे सूर्याची सावली कोणत्याच बाजुने न झुकता ती थेट खालच्या बाजुने पडते. त्यामुळे शून्य सावलीचा अनुभव मिळत आहे.
खगोलशास्त्राचे अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या दिवशी आणि किती वाजता कोणत्या गावामध्ये शून्य सावलीचा अनुभव घेता येईल याची माहिती दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खालील ठिकाणी शुन्य सावली दिवस अनुभवता येईल.
● 15 मे दुपारी 12.05 वाजता – सिरोंचा, कोपेला
● 16 मे दुपारी 12.05 वाजता – जिमलगट्टा,
● 17 मे दुपारी 12.04 वाजता – अहेरी, हेमलकसा, आलापल्ली
● 18 मे दुपारी 12.05 वाजता – एटापल्ली, मुलचेरा
● 19 मे दुपारी 12.06 वाजता – घोट, चामोर्शी
● 20 मे दुपारी 12.05 वाजता – जिरमतारी
● 21 मे दुपारी 12.05 वाजता – गडचिरोली, लेखामेंढा
● 22 मे दुपारी 12.06 वाजता – आरमोरी
● 23 मे दुपारी 12.07 वाजता – देसाईगंज, कुरखेडा






























