अहेरीत अम्ब्रिशराव, भाग्यश्री आत्राम, हनुमंतू मडावींचेही नामांकन दाखल

आज शेवटचा दिवस, उद्या अर्जांची छाननी

अहेरी : जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहेरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीतही बंडखोरी झाली आहे. भाजपचे बंडखोर अम्ब्रिशराव आत्राम यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेत नामांकन दाखल केले. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)च्या भाग्यश्री आत्राम यांनी नामांकन दाखल केले असताना काँग्रेसचे हनमंतू मडावी यांनीही नामांकन भरले.

बुधवारी अर्जांची छाननी होईल. वैध ठरलेले नामांकन मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांमध्ये राजकीय महासंग्राम सुरू होईल.

यावेळी अम्ब्रिशराव आत्राम यांनी धर्मरावबाबा आणि भाग्यश्री आत्राम यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टिका केली. माझ्यासाठी कुठलाही पक्ष नको आणि पक्षाचे चिन्हही नको. माझी जनता हीच माझी तिकीट आहे, असे ते म्हणाले.