गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या महीला मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी रेखाताई डोळस यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी नियुक्ती केली. यानिमित्त येथील विश्रामभवनात रेखाताई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते रमेश भुरसे, कृ.उ.बा.समितीचे संचालक रमेश बारसागडे, चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे, प्रशांत भुग्रूवार, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी सभापती रंजिता कोडाप, तसेच प्रतिभा चौधरी, लता पुंघाटे, दतु माकोडे, सरपंच भास्कर बुरे, उपसरपंच शेषराव कोहळे, काशिनाथ बुरांडे , रमेश अधिकारी तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.