पावसापासून बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले अहेरी, देवलमरीत छत्र्यांचे वाटप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त

अहेरी : पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट)वतीने अहेरी व देवलमरी येथे गोरगरीब नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात हे सत्कार्य करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 22 जुलै या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अहेरी तालुक्यातर्फे अहेरी बाजारवाडीतील भाजी विक्रेत्यांना, तसेच अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, देवलमरीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके, व्यंकटरावपेठाचे उपसरपंच किशोर करमे, पितांबर कुळमेथे, सांबय्या करपेत, बाबुराव तोरेम, संतोष येमुलवार, विक्रम आत्राम, राज मडावी, भास्कर आत्राम, चित्तरंजन पुलगम, मधुकर पानेम, सुरेश गुंडावार आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.