शेतकरी कामगार पक्ष गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काढणार जनसंघर्ष यात्रा

जिल्हा समितीच्या बैठकीत निर्णय

गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क आणि तयारीसंदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषदेचे गठन, हर घर जोडो अभियान, बुथ रचना आणि व्यापक जनसंपर्क करण्यासाठी जनसंघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य आणि जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. युवक, बेरोजगार, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांना घेवून शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरणार असून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करण्यासाठी पक्षाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त 3 ऑगस्टपासून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’ सुरू करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.

जिल्हा समीतीच्या या बैठकीला जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, महिला नेत्या व गडचिरोली विधानसभेच्या उमेदवार जयश्री जराते, जिल्हा समीतीचे सदस्य डॉ.गुरुदास ठेमस्कर, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, डंबाजी भोयर, एकनाथ मेश्राम, अविनाश कोहळे, चंद्रकांत भोयर उपस्थित होते.