कमलापुरात महिलांची ग्रामसभा, सरपंच रजनिता मडावींचा उपक्रम

तनुश्री आत्राम यांचे मार्गदर्शन

कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायतच्या वतीने महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण व महिलांच्या आरोग्याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सभेला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम प्रामुख्याने उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच रजनिता मडावी उपस्थित होत्या.

यावेळी गरजू स्तनदा माता, गरोदर माता, तसेच किशोरवयीन मुलींना आवश्यक वस्तूंचे वाटप सुद्धा करण्यात आले. या सभेला प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार, माजी सरपंच सांभया करपेत, सारिका गडपल्लीवार, अंगणवाडी सेविका विठाबाई भट, ग्रामपंचायत सदस्य माया आईलवार, व्यंकटेश कडार्लावार, महिला बचत गटप्रमुख भारती भट, आशा गटप्रवर्तक विद्या येजुलवार, पंचफुला गोदारी, इर्शाद शेख, कैलास कोडापे, दिनेश अरगेली, महेश अडचर्लावार, रुपेश पेनकुल यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील महिला उपस्थित होत्या.