आरमोरी : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भाकरोंडी (ता.आरमोरी) येथील विद्यार्थिनी सोनी लहीराम तुलावी या नववीच्या विद्यार्थिनीने आदिवासी विकास विभागांतर्गत नागपूर येथे घेतलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटात गोळाफेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले.
तिचे हे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यासाठी तिला मुख्याध्यापक डी.जी.डोंगरे, शिक्षक गेडाम, मेश्राम, शिक्षिका चांदेकर, बारसागडे, बोरकर, भाकरे, धनविजय, गेडाम, ढोरे, म्हशाखेत्री, वैद्य आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.