संताजी जगनाडे महाराजांनी सर्व समाजाला जागरूक केले- पिपरे

संताजी बचत गटातर्फे पुण्यतिथी

गडचिरोली : संताजी बचत गट (आशीर्वाद नगर), गोकुळनगर गडचिरोली यांच्याद्वारा आयोजित संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम दि.9 रोजी अॅड.मंगेश भरडकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा अध्यक्ष तथा संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोलीचे उपाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्राला अनेक मोठ्या संत महात्म्यांची परंपरा लाभली आहे. संताजी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तृत्वाने वैदिक धर्माचे, गीता धर्माचे पूर्ण जीवनभर पालन करत समाजातील लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. यातील एक महान संत म्हणजे संताजी जगनाडे महाराज होते. संत तुकाराम महाराजांचे ते शिष्य होते. त्यांच्या इंद्रायणी नदीत बुडविलेल्या गाथा संत जगनाडे महाराजांची अवघ्या 13 दिवसात लिहून काढल्या. अशास थोर संताची तेली समाजाला आठवण व्हावी व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या समाजाला खूप काही घेणे असल्याने तेली समाजाला जागृत, सुसंस्कृत करण्याचे काम गावागावातील तेली समाज संघटनांनी केले पाहिजे असे आवाहन यावेळी प्रमोद पिपरे यांनी केले.

यावेळी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष तथा प्रांतिक तेली महासभेच्या विदर्भ महिला आघाडीच्या उपाध्यक्ष योगिता पिपरे, सुधाकर लाकडे, पुष्पा करकाडे, सुमन गव्हारे, नीलिमा भरडकर, वंदना राखडे, वंदना कुनघाडकर, वंदना लाकडे, निर्मला हजारे, मंगला कांबळे व तेली समाजातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.