गडचिरोली : विदर्भ मंडळ अधिकारी संघटना नागपूर अंतर्गत जिल्हा शाखा गडचिरोलीची वार्षिक आमसभा येथील पटवारी भवनात संघटनेचे अध्यक्ष एन.जे. वाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यावर प्रामुख्याने विचारविनिमय करण्यात आला.
या सभेकरीता प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सचिव मलिए, नागपूर तसेच कोमलवार उपस्थित होते. सभेकरीता कार्यरत मंडळ अधिकारी तथा सेवानिवृत्त मंडळ अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवर तथा सभासदांकडून मार्गदर्शन करून विचार मांडण्यात आले. सन 2025-26 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या मंडळ अधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सभेचे संचालन विदर्भ मंडळ अधिकारी संघाचे सचिव सोमेश्वर बारसागडे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रमोद धाईत यांनी केले. या सभेकरिता मंडळ अधिकारी राजू सिडाम आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
































