Home राजकीय घडामोडी तीन राज्यात ऐतिहासिक विजय, देसाईगंजमध्ये भाजपचा जल्लोष

तीन राज्यात ऐतिहासिक विजय, देसाईगंजमध्ये भाजपचा जल्लोष

फटाके उडवत वाटले पेढे

देसाईगंज : देशातील पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयाचा आनंदोत्सव देसाईगंज येथे 4 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगर परिषदेसमोर आयोजित या जल्लोषात भाजपा व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या ऐतिहासिक विजयाबद्दल कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. या राज्यांमधील भाजपच्या विजयामुळे विकासाला नवी उभारी मिळेल, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या जल्लोषात माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, नगराध्यक्ष लता सुंदरकर, नगर उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पारधी, भाजप शहराध्यक्ष सचिन खरकाटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक युनुस शेख, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरलीधर सुंदरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रोशनी पारधी, नगरसेवक पिंकू बावणे, नगरसेवक राजेश जेठाणी, सभापती भाविका साधवानी, नगरसेवक विलास लोखंडे, नगरसेविका भारती कुथे, ज्योत्सना लुटे, पार्वता बेदरे, पल्लवी मेंढे, नगरसेवक बाळकृष्ण माडूरवार, नगरसेवक चैतनदास विधाते, ज्योतू तेलतुमडे, भास्कर बनसोड, दुबे महाराज, प्रमोद झिल्पे, अनु साधवानी, यांच्यासह भाजपा महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.