Home दैनंदिन बातम्या नऊ परिचारिकांना मिळाला ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’पुरस्कार

नऊ परिचारिकांना मिळाला ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’पुरस्कार

आरोग्य सेवेसाठी जिल्हास्तरावर गौरव

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात ‘फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील 9 परिचारिकांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके आणि जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.पंकज हेमके प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सीईओ सुहास गाडे यांनी आरोग्य विभागाच्या बळकटीकरणात परिचारिकांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अधोरेखित केले. डॉ.वर्षा लहाडे यांनी परिचारिका ह्या आरोग्य व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने कणा असल्याचे नमूद केले. तर डॉ.प्रताप शिंदे यानी तुम्ही जनतेच्या आरोग्याची काळजी घेता, त्यासोबतच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असा सल्ला सर्व परिचारिकांना दिला.

यांना मिळाला फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार

या कार्यक्रमात 9 आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात आरोग्य सेविका श्रेणीतून प्रथम क्रमांक अर्चना मुऱ्हारी मडावी (प्रा.आ.केंद्र, पुराडा), द्वितीय रजनी कांचनलाल वासनिक (प्रा.आ. केंद्र, जिमलगट्टा), तृतीय वैशाली भिवाजी झाडे (प्रा.आ.केंद्र, जिमलगट्टा), तसच आरोग्य सहाय्यिका श्रेणीतून प्रथम शोभा अरूण गेडाम (प्रा.आ.केंद्र, मालेवाडा), द्वितीय छाया नरेश गजभिये (प्रा.आ.केंद्र, कोटगुल), आणि तृतीय पुरस्कार विद्या हनुमंतराव ऊईके (प्रा.आ.केंद्र, पुराडा) यानी पटकावला. परिसेविका /अधिपरिचारिका श्रेणीतून प्रथम पुरस्कार नजमा वाहीद बेग (ग्रा.रूग्णालय, भामरागड), द्वितीय नंदा मनोहर वालको (जिल्हा सा. रूग्णालय, गडचिरोली) आणि तृतीय सुनंदा रमेश चांदेकर (उपजिल्हा रूग्णालय, अहेरी) यांनी पटकावला.

इतर विशेष सन्मान

फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कारांव्यतिरिक्त, एकात्मिक रोग सर्वेक्षण (IDSP) कामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य सेविका, सेवक आणि फार्मासिस्ट यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच, मुंबई येथे झालेल्या डीचपीई प्रशिक्षणात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दोन आरोग्य सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यात स्मिता लोणारे आणि मीना राऊत यांचा समावेश आहे.