Home क्राईम लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणारा डॉक्टर जेलमध्ये

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणारा डॉक्टर जेलमध्ये

आष्टीच्या त्या डॅाक्टरला एमसीआर

आरोपी डॅाक्टरचे हेच ते आष्टीतील क्लिनिक

गडचिरोली : एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. पण नंतर लग्नाला नकार देत पाठ फिरवल्याने एका डॅाक्टरवर गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॅा.बिजन प्रधान सरकार असे त्या डॅाक्टरचे नाव आहे. नमिता हॅास्पिटल या नावाने त्याचे आष्टी येथे क्लिनिक आहे. त्याला अटक झाली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरने संबंधित तरुणीशी विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या आधारावर त्याने तिच्याशी वारंवार संबंध ठेवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

त्या तक्रारीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्यात आरोपी डॅा.बिजन प्रधान सरकार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.