Home क्राईम गोवंश तस्करीला रोखत पोलिसांनी 19 जनावरांना दिले जीवदान

गोवंश तस्करीला रोखत पोलिसांनी 19 जनावरांना दिले जीवदान

एलसीबी व कुरखेडा ठाण्याची कारवाई

कुरखेडा : जिल्ह्यात अवैध व्यवसायांसोबतच अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक व विक्री करणा­ऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कुरखेडा पोलिसांच्या सहकार्याने मौजा गेवर्धा गावाजवळील परिसरामध्ये अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करत 19 जनावरांचे प्राण वाचवले. (खाली वाचा)

प्राप्त माहितीनुसार, दि.24 च्या रात्री सुमारास गेवर्धा ते केशोरी मार्गावर ट्रक आणि महिंद्रा बोलेरो अशा दोन चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरे भरुन वाहतूक करण्यात येणार असल्याची गोपनीय महिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. (खाली वाचा)

त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा ठाण्याच्या पोलीस पथकांनी मौजा गेवर्धा गावाजवळ सापळा रचुन पाळत ठेवली. मौजा गेवर्धा ते केशोरी मार्गावर ट्रक आणि बोलेरो पिकअप अशी दोन वाहने संशयीतरित्या येताना दिसताच पोलिसांनी बॅरिकेड्ट लावून दोन्ही वाहनांना थांबवून पाहणी केली. (खाली वाचा)

त्या दोन्ही मालवाहू वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीचा कुठलाही परवाना नव्हता. (खाली वाचा)

पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, ट्रक क्रमांक टीजी 12, यु 4896 मध्ये 11 गाई आणि 2 बैल (एकूण किंमत 1,85,000 रुपये), तर वाहन क्रमांक एमएच 35 एजे 4601, महिंद्रा बोलेरो पिकअप यामध्ये 4 गाई व 2 बैल (किंमत अंदाजे 80,000 रुपये) आढळले. (खाली वाचा)

दोन्ही वाहनांचे चालक शेख ईब्रााहिम शेख इस्माईल (40 वर्षे), रा.मेहबुब नगर, नागपूर आणि मुफस्सिल कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी (25 वर्षे), रा.चिराग अली चौक, नागपूर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील वाहने आणि जनावरे मिळून एकूण 19 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (खाली वाचा)

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज.जी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (खाली वाचा)

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.अरुण फेगडे व पोस्टे कुरखेडाचे पोनि.अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि.विश्वंबर कराळे, अंमलदार तुषार खोब्राागडे, चालक गणेश, तसेच कुरखेडाचे परि.पोउपनि. कुणाल रेगुलवार, हवालदार अजीतकुमार सुरजुसे, नायक अमोल आलाम यांनी सहभाग घेतला.