Home पब्लिक प्रॉब्लेम पिंपळगाव-विहीरगाव भागात हत्तींचा धुमाकूळ; पीकांसह सोलरचे नुकसान

पिंपळगाव-विहीरगाव भागात हत्तींचा धुमाकूळ; पीकांसह सोलरचे नुकसान

आ.मसराम यांच्याकडून शेतीची पाहणी

देसाईगंज : तालुक्यातील पिंपळगाव परिसरात रानटी हत्तींनी शेतात धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कापणी करून शेतात ठेवलेल्या भाताच्या पिकाचे तसेच पुंजण्यांचे नुकसान झाले असून, शेतातील सोलर पंपाचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम यांनी पिंपळगाव येथे भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी रानटी हत्तीमुळे भातपिकाचे, कापणी केलेल्या धानाच्या पुंजणे आणि सोलर पंपाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कमलेश बारस्कर, गजेंद्र नाईक, पुरुषोत्तम देशकर, वसंत बगमारे, रितेश गाडगे, रोशन मेश्राम, वनरक्षक धात्रक, वनरक्षक राऊत, संजय घरत, टीकाराम धोटे, देवानंद भोयर, सदानंद दोनाडकर, संदीप धोटे, सुरेश बुल्ले, बिसन घरत, राजेंद्र राऊत, ईश्वर नाईक, काशिनाथ धोटे, भरत भोयर, जितेंद्र भोयर, सुरज पारधी, लीला साई प्रधान, कृष्णा भोयर, दिनेश्वर प्रधान, हेमराज नाकतोडे, शकुंतला लेंडे, पुंडलिक राऊत, शामराव भोयर, श्रावण पत्रे, मुरलीधर प्रधान, सुनीता ताराम, सुगंधा प्रधान, अरुणा प्रधान, मेघश्याम दोनडकर, उर्मिला सहारे, सुमिता भोईर, अश्विनी भोईर, मनोर प्रधान, जगदीश जराते, माधव भोयर आदी उपस्थित होते.