पोर्ला : येथील शिव मंदिरात केशवराव दशमुखे गुरुजी यांनी आयोजित केलेल्या मातोश्री स्व.तुळसाबाई किसनजी दशमुखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तीन दिवसीय ग्रामगीता वाचन सप्ताहाचे आयोजन केले आहे. या ग्रामगीता वाचन सप्ताहाचा शुभारंभ रविवार, दि.22 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता करण्यात आला.
यावेळी सिंधुबाई व केशवराव दशमुखे गुरुजी यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करून ग्रामगीता वाचन सप्ताहास सुरुवात करण्यात आली. दि.22 ते 24 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत झरकर महाराज हे दररोज सकाळी 6 ते 9 व सांयकाळी 6 ते 9 यादरम्यान ग्रामगीतेचे वाचन करणार आहेत.
आईच्या स्मृती जपण्याबरोबरच ग्रामगीतेतील विचार, संत तुकडोजी महाराज यांचे ग्रामविकासाचे तत्त्वज्ञान, संस्कार आणि आध्यात्मिक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
याप्रसंगी विनोद दशमुखे व सुषमा दशमुखे, विलास दशमुखे व लता दशमुखे, रामचंद्र दशमुखे, संतोष दशमुखे व योगिता दशमुखे, गजानन दशमुखे, शुभम दशमुखे, दादाजी दशमुखे, बापूजी फरांडे, भास्कर मेश्राम, आराध्य दशमुखे, अशोक चापले, राजू सालोडकर, निलकंठ संदोरकर, लोमेश कोलते, गजानन लाडवे, महादेव बांबोडे, मनोज किरमिरे, माधव निकुरे, गोविंदराव सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
































