गडचिरोली : देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. याशिवाय रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सूचनेनुसार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार यांनी केले होते.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून गरजूंना जीवनदान देण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला गौरव येनप्रेडीवार, प्रफु्ल्ल आंबेरकर, आशिष वाढई, आकाश बोलुवार, कल्पक मुप्पीडवार, कुणाल ताजने, संकेत येनप्रेडीवार, विक्की निकोसे, पितू पुरावर, चैतन्य बोलुवर, फैजन पठाण, शुभम रामटेके, पराग कंनके, दानिश वाडके, प्रणय सुरांकर, नतीन कुकडकर, जावेद खान, भास्कर उरकुळे, पिंटू वाढई, मिथुन गेडाम, विक्की पूरावर, अभिषेक कोटकोंडवर, शुभम नैताम, आकाश पोट्वार, चैतन्य चाडगुळवर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.