Home दैनंदिन बातम्या जोरदार पाऊस व वादळाने कुरूडजवळ कोसळले झाड

जोरदार पाऊस व वादळाने कुरूडजवळ कोसळले झाड

मुख्य मार्गावर 1 किमी वाहनांची रांग

देसाईगंज : देसाईगंजपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुख्य मार्गावर झाड कोसळले. त्यामुळे देसाईगंज–आरमोरी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. (खाली वाचा)

झाड मुख्य रस्त्यावर आडवे पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी सुमारे 1 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बराच वेळ वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागली. (खाली वाचा)

दरम्यान, पावसाळ्यात देसाईगंज–आरमोरी मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.