यावर्षीही तुटणार तब्बल 291 गावांचा संपर्क, प्रशासनाने काय केल्या उपाययोजना?

ऐका, काय सांगतात जिल्हाधिकारी संजय दैने

गडचिरोली : पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी आव्हानात्मक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याचे चार महिन्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला आधीच करावे लागते. यावर्षीसुद्धा जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 291 गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने त्या गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानामार्फत वाटप केल्या जाणारा धान्यसाठा, तसेच पुरेशा प्रमाणात औषधींचा साठा करून ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी जिल्ह्याच्या दुर्गम भागात रस्ते आणि पुलांची उभारणी केली जात आहे. तरीसुद्धा नदीनाल्यांच्या पुराचा फटका गावकऱ्यांना का सहन करावा लागतो, याचे कारणही जिल्हाधिकारी संजय दैने यांनी स्पष्ट केले. काय म्हणतात जिल्हाधिकारी, पहा सोबतचा व्हिडिओ.