गडचिरोली : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातील नगर परिषदेची इमारत चांगलीच असणार, असा सर्वसाधारण समज असू शकतो. पण थांबा, तुमचा हा समज चुकीचा ठरू शकतो. कारण पावसाळ्यात नगर परिषद कार्यालयात जायचे असेल तर गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाण्याची तयारी ठेवावी लागते. ही स्थिती आजची नसून गेल्या अनेक वर्षांपासून या स्थितीला तोंड द्यावे लागत आहे, हे विशेष.
गडचिरोली नगर परिषदेत जाताय, मग पाण्यातून वाट काढण्याची तयारी ठेवा
पाऊस आला की पडतो पाण्याचा वेढा