अल्पवयीन युवतीला नको तो स्पर्श, डॅाक्टरवर विनयभंगाचा गुन्हा

आलापल्लीत तपासणीसाठी आली होती

अहेरी : आजाराच्या तपासणीसाठी क्निनिकमध्ये डॅाक्टरकडे आलेल्या एका अल्पवयीन युवतीला डॅाक्टरने नको तो स्पर्श (बॅड टच) केला. ही बाब त्या युवतीला सहन न झाल्याने तिने कुटुंबियांसोबत पोलिसात तक्रार केली. त्यावरून त्या खासगी डॅाक्टरवर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्या डॅाक्टरला अटकही करण्यात आल्याचे सांगितले जाते. डॅा.संतोष असे त्या डॅाक्टरचे नाव आहे.

सदर डॅाक्टरचा आलापल्लीत खासगी दवाखाना आहे. रविवारी ग्रामीण भागातील एक १७ वर्षीय युवती त्यांच्याकडे प्रकृती तपासणीसाठी आली होती. यावेळी एक रुग्ण महिला बाहेर बसलेली होती. डॅाक्टर तिची तपासणी करत असताना त्या युवतीला त्याने बॅड टच केल्याचे सदर युवतीने तक्रारीत म्हटले. या प्रकाराने भांबावलेल्या युवतीने कुटुंबियांना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. रात्री डॅाक्टरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी (दि.२७) डॅाक्टरला न्यायालयात हजर केल्यानंतर एमसीआर दिला. अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.