गडचिरोली : चातगावसारख्या दुर्गम आदिवासी भागातील गोरगरीब, उपेक्षित, सामान्य जनतेच्या आरोग्य रक्षणार्थ आणि त्यांच्या जनजागृतीसाठी डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजच्या स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनतर्फे मोफत रोगनिदान व औषधी वाटप शिबिराचे आयोजन केले होते. यात अनेक महिला, पुरुष, बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात स्त्रियांमधे रक्ताल्पता व संधीशुलाचे प्रमाण जास्त आढळले. तसेच मधुमेहाचे प्रमाण, खोकला व अनियमित ज्वर यांचेही प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले. या समस्येवर बोलताना ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्टचे प्रमुख पाहुणे असलेले डॉ.मनिष मेश्राम म्हणाले, आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे आरोग्याविषयी जागृती होऊन वेळीच उपचार मिळाल्याने सुदढ आरोग्य राखण्यास मदत होते.
संस्थाध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांनी लोकांना आरोग्याबाबत जागरूक राहुन काळजी घेण्याचे आवाहन केले. नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गावात शिबिर असल्याने सहज तपासणी करायला येणाऱ्यांना, ज्यांना काहीच त्रास जाणवत नाही अशा अनेकांना मान्र रक्तदाब, मधुमेह असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा शिबिरांचे महत्व अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले.
या शिबिरात डॉ.प्रमोद साळवे, डॉ.अमित रामने, डॉ.धनश्री रामने यांनी रुग्णांची तपासणी करून औपधोपचार केले. परिचारिकेचे काम निकिता सडमेक, इशा बैस, सानु कोंडागोली, साक्षी मडावी, दिव्या मडावी, सायली बुरे यांनी केले. औषधी वितरणाची जबाबदारी शिल्पा गावडे व सानिया सडमेक यांनी सांभाळली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत कोंडागुर्ला, शुभांगी हलामी, स्विटी नरोटे, आकांक्षा आखाडे, श्रीशा अल्लुर, नितीन अल्लुर, राज अल्लुर, विनय कुजुर, अर्जुन तिम्मा, वैशाली पिपरे, फर्मेश भैसारे, पियुष नंदेश्वर, ताजीसा कोडाप, त्रध्दा कुनघाडकर, शुभांगी तुलावी, राजेश्वरी सिडाम, राखी मोगरकर, शुभांगी सयाम, खोमेश बोबाटे, दिपक निकुरे यांनी सक्रीय सहकार्य केले.