खासदार अशोक नेते यांनी केले गडचिरोलीतील निवासस्थानी ध्वजारोहण

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकामध्ये देशभावना जागृत व्हावी यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरूवात केली. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार खासदार अशोक नेते यांनीही आपल्या गडचिरोली येथील निवासस्थानी सोमवारी उत्साहात तिरंगी ध्वज फडकविला. तिरंगा फडकवुया, अमृत महोत्सव आनंदाने, उत्स्फूर्त, देश भावनेने साजरा करूया व प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवुया, असे आवाहन यावेळी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनु.जनजाती मोर्चा) अशोक नेते यांनी केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस (एस.टी.मोर्चा) प्रकाश गेडाम, आदिवासी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस योगेश कुमरे, बंगाली समाजाचे नेते रतन सरकार, भाजपाचे युवा कार्यकर्ते संजय खेडेकर, रवि सिडाम, भाग्यवान पिपरे तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.