Home दैनंदिन बातम्या साखरवाडे प्रकरणात सहायक मुख्य अभियंत्यांनी दिले चौकशीचे आदेश

साखरवाडे प्रकरणात सहायक मुख्य अभियंत्यांनी दिले चौकशीचे आदेश

काम वाटपाचीही चौकशी करा

गडचिरोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर सा.बां.विभागाच्या सहाय्यक मुख्य अभियंता निशा धाबेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अधीक्षक अभियंत्यांना पत्र देऊन त्यांनी अन्य कार्यकारी अभियंत्याकडून तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

निकृष्ट पूल बांधकाम, रस्ते व पूल दुरूस्तीच्या नावाखाली कामे न करता कोट्यवधीची बिले काढणे, तसेच आॅफलाईन निविदा काढून कामे विकण्याचा आरोप कात्रटवार यांनी केला होता. यासोबत आता कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या नातेवाईकाला नियमबाह्यरित्या कोट्यवधीची कामे दिल्याचाही आरोप केला आहे. त्याचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कात्रटवार यांनी केली आहे.

कामे वाटप करण्यासाठी शासनाने नियम व निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार कामाचे वाटप करणे आवश्यक आहे. परंतू साखरवाडे नियम व निकष डावलून कारभार करीत असल्याचा आरोप कात्रटवार यांनी तक्रारीत केला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांनी आपल्या पुतणीला कोट्यवधीची कामे परस्पररित्या दिली. आजही दुसऱ्यांच्या नावाने त्यांची पुतणी ठेकेदारी करत आहे. त्यामुळे त्या कामांचीही चौकशी करण्याची मागणी अरविंद कात्रटवार यांनी केली आहे.

निवेदन देताना यादवजी लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगण चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, अनुज कुमिटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे आदी उपस्थित होते.