गडचिरोली : शहरातील नवेगाव भागात स्टार-इलेव्हन संघाच्या सौजन्याने खासदार नमो चषक २०२४ या रबरी बॅाल फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या पटांगणात करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी फित कापून केले.
यावेळी खा.नेते खेळाडूंना शुभेच्छा देताना म्हणाले, सात-आठ दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत कोणताही वादविवाद न करता खिलाडू वृत्तीने खेळावे. पंचाचा निर्णय अंतिम समजूनच खेळाडूंनी आपल्यातील कौशल्य दाखवावे. यावेळी खा.नेते यांनी पिचवर उतरून हाती बॅट घेऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी प्रामुख्याने भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत कोरडे, ग्रा.पं.सदस्य डॉ.दीप्ती अभिजीत कोरडे (माटे), सरपंच राजू खंगार, पं.स.माजी सभापती मारोतराव इचोडकर, कीर्ती मासुरकर, हरिश माकडे, युवा नेते हितेश डोंगरे, अभिजीत मोहुर्ले, मंडळाचे सदस्यगण अक्षय इंगळे, चेतन पेंदाम, बाबा वासनिक, संदीप निखारे, श्याम तुनकलवार, गुरुदास भोयर, दर्शन वालदे, प्रफुल्ल ठाकरे, आकाश चौधरी, कुणाल बावणे, नितीन देवतळे, कृष्णा पत्री, अजयसिंग पटवा, पारस धुरिया, राम बानबले, केतन गिरडकर, मंगेश सोनुले, अक्षय दहीकर, योगेश लाकडे, सोनू रेचनकर, गणेश जोंधूळकर, मोहीत मेश्राम, गौतम कोरडे, साई रोहनकर, श्रावण अंबाला, उज्वलसिंग दुधानी, साहिल मेश्राम आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन दर्शन वालदे यांनी, तर आभार अक्षय इंगळे यांनी मानले.