गडचिरोली : गडचिरोली शहरापासून १२ किलोमीटरवर असलेल्या गुरवळा गावानजिकच्या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यांपासून अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे. याशिवाय या वनक्षेत्रात काही आकर्षणाचे केंद्र ठरणारी स्थळंही आहेत. एवढेच नाही तर विविध प्रकारची दुर्मिळ झाडेही आहेत. त्या सर्वांना जवळून न्याहाळण्यासाठी शनिवारी (दि.११) गुरवळा नेचर सफारीला पुन्हा एकदा सुरूवात करण्यात आली.
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली गुरवळातील नेचर सफारी पावसाळ्याच्या चार महिन्यात वनपर्यटकांसाठी बंद असते. आता दिवाळी सुट्यांचे औचित्य साधून दि.११ ला पुन्हा एकदा नवीन उत्साहाने वनपर्यटकांसाठी ही नेचर सफारी सुरू करण्यात आली आहे. यावेळी सरपंच जया मंटकवार यांनी हिरवा झेडा दाखवून पहिले वाहन नेचर सफारीसाठी रवाना केले.
यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप मेश्राम, वनरक्षक गुरु वाढई, हिरापूर व गुरवळा ग्रामपंचायतच्या सरपंच जया मन्टकवार, गुरवळाचे उपसरपंच प्रकाश बांबोळे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती हिरापूरचे अध्यक्ष रमेश मेश्राम, रुपेश चौधरी, पंडित मेश्राम, चंद्रकांत भोयर, माणिक गावडे, भावना मेश्राम, शारदा गेडाम, टायगर टीम आणि गुरवळा नेचर सफारीचे गाईड उपस्थित होते.
(विविध मान्यवरांच्या दिवाळी शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)