गडचिरोली : धानोरा पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कारवाफाच्या वतीने कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या मैदानावर 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय धानोरा तालुकास्तरीय शालेय बाल कला व क्रीडा संमेलनाचे आयोजन केले आहे. उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी राहणार आहेत.
या क्रीडा संमेलनात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रिले या सांघिक खेळांसह वैयक्तिक खेळाचे तसेच बुद्धिबळ स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्राथमिक व माध्यमिक या दोन गटात होणाऱ्या स्पर्धांमध्ये धानोरा तालुक्यातील 12 केंद्रातील सुमारे 600 खेळाडू सहभाग घेऊन क्रीडा कौशल्य दाखविणार आहेत.
बक्षीस वितरण रविवार 29 डिसेंबरला दुपारी 3 वाजता होणार आहे. गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून सुमारे 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.