राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा संघटकपदी सुनील चडगुलवार

सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल

गडचिरोली : येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील चडगुलवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्यांची गडचिरोली जिल्ह्याचे संघटक म्हणून दोन वर्षाकरिता नियुक्ती केली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.बबनराव तायवाडे यांनी ही नियुक्ती केली.

त्यांना ओबीसी महासंघाच्या सभेत मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या नियुक्तीचे शेषराव येलेकर, रामकृष्ण ताजने, दादाजी चापले, दादाजी चुधरी, प्रवीण मुक्तावरम, चंद्रकांत शिवणकर, दामदेव मंडलवार, निरंजन वासेकर, राकेश चडगुलवार, दिलीप मेश्राम, दामोदर मांडवे इत्यादींनी स्वागत केले.