उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासींच्या समस्यांवर मुंबईत मंथन

माजी खा.अशोक नेते यांची उपस्थिती

गडचिरोली : महाराष्ट्रातील आदिवासी समाज भाजपपासून दूर जाऊ नये, त्यांच्या समस्या कोणत्या आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमध्ये आणखी काय सुधारणा करता येईल याबाबत मुंबई भाजपच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या महत्वपूर्ण बैठकीला भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे राज्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नेते यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. आदिवासी समाजाला पक्षाच्या अधिक जवळ आणण्यासाठी यावेळी मंथन करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, माजी मंत्री डॉ.भारती पवार, भाजपच्या प्रदेश महामंत्री माधवी नाईक, माजी खा.डॉ.हिना गावीत, माजी मंत्री डॉ.अशोक ऊईके, आ.डॉ.संदीप धुर्वे, माजी आमदार उत्तम इंगळे, माजी आ.संजय पुराम, भाजप एसटी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अॅड.किशोर काळकर, भाजप प्रदेश कार्यालय प्रमुख रवि अनासपुरे, भाजपचे गडचिरोली जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांच्यासह आदिवासी आमदार, प्रदेश पदाधिकारी, आदिवासी नेते, विधानसभा मतदार संघांचे प्रमुख उपस्थित होते.